Thursday, May 14

Tag: MLA Bhimrao Keram took darshan

Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

धार्मिक, नांदेड
इस्लापूर/किनवट | महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील श्री क्षेत्र नागडोह देवस्थानात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान महादेवाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान आमदार भीमराव केराम यांनी उपस्थित होऊन महादेवाचे दर्शन घेऊन शेतकरी, मायबाप जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान परिसरात सुव्यवस्थित दर्शन व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते....
error: Content is protected !!