कलदगाव येथील जि प प्रा.शाळेतील शिक्षकांने विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिल्यामुळे बदली करण्याची पालकांची मागणी -NNL

अर्धापूर। तालुक्यातील कलदगाव येथील जि प प्रा.शाळेतील एका शिक्षकांने विद्यार्थी -व विद्यार्थीनीला १०० उठबैशा काढायला लावण्याची शिक्षा दिल्याने हे विद्यार्थी बिमार पडले आहेत.
पालकांना विद्यार्थ्यांनी हा प्रकार सांगीतल्याने सबंधीत पालक संतप्त झाल्याने पालकांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याकडे लोणे या शिक्षकाची बदलीची मागणी केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील  येळेगाव केंद्रअंतर्गत कलदगाव येथील जि प प्रा शाळेतील शिक्षक विलास लोणे यांनी शाळेतील काही विद्यार्थी-व विद्यार्थ्यांना अभ्यास न केल्याची  शिक्षा म्हणून चक्क १०० उठबैशा काढायला लावल्याने सदरील विद्यार्थी बिमार पडले असून हा गंभीर प्रकार विद्यार्थ्यांनी पालकांना सागीतल्याने या शिक्षकाची बदलीची मागणी देवजी केशव गव्हाणे व सतिष उतमराव गव्हाणे यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे,या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button