HomeBlogIndependence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे...

Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष…! – NNL

श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | अमृत महोत्सवानिमित्त ७८ वा स्वातंत्र्य दिन जीनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल,माहूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माहूर शहराचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मिलिट्री पथक, भव्य तिरंगा पथक, लाठी काठी पथक, लेझीम पथक, भारत माता रथ, वर्ल्ड कप विजयी रथ, वीर भगतसिंग रथ, सर्वांचे लक्ष आकर्षित करणारे स्केटिंग पथक, आणि छोटे छोटे विद्यार्थी विविध वेशभूषा मध्ये खूप गोड दिसत होते.

IMG 20240819 WA0021 Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष...! - NNL

तसेच जीनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या घोषणेने संपूर्ण माहूर शहर दणाणून गेले होते. हे संपूर्ण देखावे याची देही याची डोळा बघण्यासाठी माहूर, महागाव तालुक्यातील पालकांनी गर्दी केली होती. ही रॅली यशस्वी करण्यासाठी पालकांचे मोठे योगदान दिसले,तसेच जीनियस किडझ च्या सर्व स्टाफनी आणि विद्यार्थ्यांनी जो उत्साह दाखविला, जो जोश दाखविला त्यामुळे बाल चेहऱ्यापासून तर वृद्ध चेहऱ्यापर्यंत देशाबद्दलचा अभिमान झळकत होता. आणि रॅलीचा समारोप सर्व विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या भोजनाने करण्यात आला.

IMG 20240819 WA0022 Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष...! - NNL

या प्रसंगी माजी आमदार प्रदीप नाईक,माजी जि.प.उपाध्यक्ष समाधान जाधव,नगराध्यक्ष माहूर फिरोज दोसानी,राष्ट्रवादी माहूर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,पत्रकार नंदुभाऊ संतान, विजय आमले,कादर दोसानी,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माहुर तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील,राजर्षी शाहू फाऊंडेशन संचालक भाग्यवान भवरे,रफीक सौदागर,अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सर्फराज दोसानी,तसेच पालक,शिक्षकवृंद आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments