Mahurgad Renuka darshan ; रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर गडावरील रविवार निमित्त अलोट गर्दी पिण्यास पाणी नसल्याने भाविकांचे हाल -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देविच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शना करीता गडावर नवरात्रौत्सवातील पहिला रविवार भाविकांच्या अलोट गर्दीचा ठरला. मंदिराच्या पहिल्या पायरी पासून देवीचे मुखदर्शन घेण्यासाठी सकाळी ५ वा,पासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटेपासूनच भाविक मंदिरात यायला सुरुवात झाली.


देशभरातील परीवारा सह भाविकांनी हजेरी लावली भाविकांच्या गर्दीने माहूर शहर व मंदिर परिसर गजबजून गेला. घटस्थापना पासून पाहीजे तेवढी भाविकांची गर्दी नव्हती त्यामुळे प्रशाशनास गर्दी होणार नाही असे वाटले ? परंतू रविवार रोजी सुट्टी असल्याने अचानक गर्दी वाढली. खाजगी वाहनास गडावर जाण्यास बंदी असल्याने एसटी कडून १०० बस मागविण्यायत येणार असल्याचे आगार प्रमुख यानी आढावा बैठकित सागितले होते. पंरतु पतेक्षात मात्र येवढ्या बसेस दिसत नव्यत्या. मात्रुतिर्थ रस्त्यावर असलेली नपची पार्किंग सकाळी ९ वा फुल झाल्याने पेट्रोल पंपा समोरील वाहन लावण्यास सुरवात झाली पंरतु ति पण १ वाजे पर्यंत फुल झाल्याने व एसटी कमी पडल्याणे भाविकांचे बेहाल सूरु आहेत.


कर्तव्य बजावण्याकरीता आलेले काही कर्मचारी त्याच्या नातेवाहीक,मित्र,व काही लोकप्रतीनिधीचे मित्र VIP चे खाजगी वाहन गडावर सोडत असल्याने एसटी महामडळास त्रास होत असल्याने वाहन गडावरून येण्यास वेळ लागत असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकारी यांनी सागितले. रेणुका गडावर दर्शना करीता पाय-या वर कठडे करून टप्पे पाडण्याय आले दर्शन करीता किमान ४ तास लागत असल्याचे भाविकांनी सागितले पण दर्शन रागेत पिण्यास पाणी नसल्याचे भविकांनी सागितले.



गडावरील परशुराम मंदिर परिसरात दि.२७ सेप्टेंबर रोजी यात्रा नियोजन आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध .जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक ,सहा. जिल्हाधिकारी किनवट तथा सचिव मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते, सर्व विभाग प्रमुखांनी उत्सव नियोजन योग्य रीत्या पार पाडणार असल्याचे सागितले होते.


मात्र प्रत्येक्षात आज,एसटी,महामंडळ, नगरपंचायत ,रेणुका देवी संस्थान,आरोग्य विभाग,अन्न व प्रशासन विभाग, सार्वजनिक बाधकाम विभाग,यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मात्र दिसून आली नाही. त्यामुळे भारताच्या कानाकोप-यातून आलेल्या भाविकांचे हाल सूरू आहेत. बैठकित दिलेल्या अश्वासनाची पुर्तता झाली कि नाही? हे पाहण्याकरीता कोण आहे ? भाविकांचे प्रश्न ऐकण्याकरीता कोण?



