Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

लोहा| लोहा शहरात दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस तहसीलदार विठ्ठल परळीकर प्रमुख उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव शांततेत, सलोख्याने व विधायक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार परळीकर यांनी केले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीत, शहरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याची माहिती देण्यात आली. यंदा हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीस पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, गटनेते भास्कर पवार, शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर पावत, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, बालाजी खिल्लारे, गंगाधर महाबळे, सदा तेलंग, मारुती जंगले, राजेश गौस, उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी गौस पटेल, जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल धुतमल, प्रसिद्धी प्रमुख इमाम लदाफ, कोषाध्यक्ष बाळासाहेब कळकेकर, उपाध्यक्ष योगेश कदम, विलास चुडावकर, पोलीस उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे, भोसले, बीएसडीचे प्रमुख जमादार सदाशिव जामकर, श्री गिरे, अन्वर पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी शिवजयंतीनिमित्त घ्यावयाच्या सुरक्षाविषयक काळजी, वाहतूक नियोजन तसेच डीजे बंदीचे नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान, नगराध्यक्ष शरद पवारउपनगराध्यक्ष करीम शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी गटनेते भास्कर पाटील पवारगंगाधर महाबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button