मुक्रमाबाद, मुखेड, बस्वराज वंटगिरे ।मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन (अंतर विभागीय) रस्सीखेच क्रीडा स्पर्धा (मुले-मुली) स्वामी विवेकानंद महाविद्यालय व स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडाविभागाकडून दि ०१ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली.
या क्रिडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माननीय श्री व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब हे उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे क्रिडा संचालक डाॅ भास्कर माने उपस्थित होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून मुक्रमाबाद पोलीस ठाणे येथील सपोनि मा. श्री तिडके साहेब,संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील गोजेगावकर, प्राचार्य डॉ विवेक इनामदार, पत्रकार अशोक लोणीकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मा म गायकवाड यानी केले.या कार्यक्रमात प्रस्ताविकपर विचार प्राचार्य डॉ विवेक इनामदार यांनी थोडक्यात मांडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ भास्कर माने यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनीना रस्सीखेच या सांघिक क्रिडा स्पर्धेचे महत्व सांगताना उद्घाटनपर भाषणात खेळाडूने (विद्यार्थानी) सांघिक भावनेने व खेळाडूवृतीने प्रदर्शन करावे.
जय-पराजयाचा विचार न करता खेळाडूवृत्ती जोपासावी असा संदेश दिला. सदरील स्पर्धेत मुले-मुलीचे एकूण १० संघ उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेतासंघ मुलांमध्ये नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड यांनी पटकाविला.
तर द्वितीय क्रमांक विजेतासंघ सायन्स कॉलेज नांदेड यांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक संघ विजेता यशवंत महाविद्यालय नांदेड यांनी पटकाविला. तर मुलींमधून प्रथम विजेतासंघ हा यशवंत महाविद्यालय नांदेड तसेच द्वितीय क्रमांक महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर व तृतीय क्रमांक शिवाजी महाविद्यालय उदगीर यांनी पटकविला आहे.
सदरील कार्यक्रमासाठी विद्यापीठाने नियुक्त केलेले निवड समिती सदस्य म्हणून डॉ दिलीप भडके, डॉ सचिन चामले, डॉ दिलीप काळे व पंच म्हणून डाॅ राहुल वाघमारे, प्रियंका गायकवाड, गंगासागर गोईनवाड यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच डाॅ निहाल खान, डॉ माढेकर मॅडम, डाॅ नितेश स्वामी, डाॅ अभिजित मोरे हे संघव्यवस्थापक म्हणुन उपस्थित होते.
सदरील रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेच्या शेवटी विजेता संघाना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदरील स्पर्धा पाहण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी-कर्मचारी मोठ्यासंखेने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे क्रिडाविभाग प्रमुख डॉ दिलीप काळे यांनी मानले.