मुखेड, बस्वराज वंटगिरे । तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात दि. 29 रवीवार रोजी व्हाईस आॕफ मीडीयाची बैठक पञकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मराठी पञकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या बैठकीत सर्वानुमते व्हाईस आॕफ मीडीया शाखा मुक्रमाबाद ची नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
यामध्ये व्हाईस आॕफ मीडीया मुक्रमाबाद अध्यक्षपदी रज्जाक कुरेशी तर सचिवपदी अशोक लोणीकर, कार्याध्यक्षपदी जलील पठाण ,उपाध्यक्ष रमेश राचलवार, संघटक मष्णाजी बाजगीरे, सहसचिव बालाजी दमकोंडवार, कोषाध्यक्ष शाकेर काझी, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर राजूरे, काशीनाथ इंदुरे, सदस्य गणेश अकुलवार, आदिंची निवड करण्यात आली असुन पञकार संंघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी व जिल्हाकार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्याहस्ते निवडीचे नियुक्ती पञ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस भालचंद्र तिडके, पञकार अजित पवार , केशव रापतवार, बाबुराव वाघमारे, सतिश वाघमारे, आदि उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेशदादा पंदीलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गौसखाँ पठाण, उपसरपंच सदाशीव बोयवार, शेतकरी संघटनेचे नेते शिवशंकर पाटील कलंबरकर, युवानेते दिनेशअप्पा आवडके, आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमाचे सूञसंचलन पञकार रज्जाक कुरेशी यांनी केले तर मष्णाजी बाजगीरे, यांनी आभार मानले.