मुक्रमाबाद, मुखेड, बस्वराज वंटगिरे l मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे होत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात गेल्या ४० वर्षापासून लेंडी धरणग्रस्तावर मोठे अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये मुक्रमाबाद शासकीय विश्राम ग्रहामध्ये या समितीची गठित करण्यात आली.
११ गावातील सर्व नागरिकांच्या वतीने मुक्रमाबाद येथील ग्रामपंचायत सदस्य बालाजी आप्पा पसरगे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून बालाजी पाटील बनबरे तथा शिवराम हसणाळे रावणगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्याध्यक्ष म्हणून दिनेश आवडके, नीलकंठ पाटील हिंगोलीकर,सचिव म्हणून राजुप्पा देवणे, शिवा पाटील भासवडेकर, सहसचिव व्यकटराव पाटील टिपणे,प्रदीप पाटील इंगोले, कोषाध्यक्ष कमलाकर अगदे,अनिल पाटील, दिलीप नुकुलवाड, आनंदराव गोजेगावे, तसेच प्रवक्ता म्हणून जलील पठाण, बालाजी क्यादरकुंटे यांची निवड करण्यात आली.
तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून नंदकुमार खंकरे,विनोद आपटे, संजय राचलवार, बसवराज वटगिरे तर सदस्य म्हणून कपिल पाटील बनबरे,सय्यद जलालोद्दीन, सुधाकर मारंपल्ले, तुकाराम शिंदे, मशरूम पटेल, बाबुराव धोंडीबा, शेळके हनुमंत, सचिन पाटील खंडागळे, प्रवीण क्यादरकुंटे,हरिभाऊ फिरंगळवाड, संग्राम सुधाळे, संजय रकटे, विश्वनाथ माळशेट्टे बाबूअप्पा भंगे, श्रीधर देशमुख, राहुल इंदुरे, विजय वाघमारे तर मार्गदर्शक म्हणून गणपतराव क्यादररकुंटे, अविनाशराव देशपांडे हसनाळकर, विठ्ठलराव पाटील कोहिनूरकर, व्यंकटराव देशमु, व्हीएस पाटील कुनुरकर, अशोकराव देशमुख, अशोक सावकार वट्टमवार, विश्वनाथ खळुरे,यांची नियुक्ती करण्यात आली. या समवेत या समितीचे समन्वयक म्हणून हेमंत खंकरे यांची नियुक्ती करण्यात आली.