Lendi ; लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वयक समितीची स्थापना – NNL
मुक्रमाबाद, मुखेड, बस्वराज वंटगिरे l मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे होत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात गेल्या ४० वर्षापासून लेंडी धरणग्रस्तावर मोठे अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये मुक्रमाबाद शासकीय विश्राम ग्रहामध्ये या समितीची गठित करण्यात आली.
११ गावातील सर्व नागरिकांच्या वतीने मुक्रमाबाद येथील ग्रामपंचायत सदस्य बालाजी आप्पा पसरगे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून बालाजी पाटील बनबरे तथा शिवराम हसणाळे रावणगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्याध्यक्ष म्हणून दिनेश आवडके, नीलकंठ पाटील हिंगोलीकर,सचिव म्हणून राजुप्पा देवणे, शिवा पाटील भासवडेकर, सहसचिव व्यकटराव पाटील टिपणे,प्रदीप पाटील इंगोले, कोषाध्यक्ष कमलाकर अगदे,अनिल पाटील, दिलीप नुकुलवाड, आनंदराव गोजेगावे, तसेच प्रवक्ता...
