Swami Vivekananda College ; स्वामी विवेकानंद महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन – NNL
मुक्रमाबाद, मुखेड, बस्वराज वंटगिरे ।मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन (अंतर विभागीय) रस्सीखेच क्रीडा स्पर्धा (मुले-मुली) स्वामी विवेकानंद महाविद्यालय व स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडाविभागाकडून दि ०१ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली.
या क्रिडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माननीय श्री व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब हे उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे क्रिडा संचालक डाॅ भास्कर माने उपस्थित होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून मुक्रमाबाद पोलीस ठाणे येथील सपोनि मा. श्री तिडके साहेब,संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील गोजेगावकर, प्राचार्य डॉ विवेक इनामदार, पत्रकार अशोक लोणीकर उपस्थित होते.
या कार्यक...
