नांदेड। नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत एक ट्रक चोरीला गेला होता, याबाबत तपास करून चोरी उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते, दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी आरोपीसह चोरीला गेलेला ट्रक ताब्यात घेतला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विश्वदिप रोडे, पोलीस अंमलदार नरेद्र यालावार, अजरोद्दिन सय्यद, शेख फारुख यांनी या चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला होता.
फिर्यादी दिपक चोकोबा कोकरे वय 44 वर्ष व्यवसाय व्यापार रा. वडगांवरोड वाजेगांव ता. जि. नांदेड यांनी ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्या गुन्हयातील आरोपी व गुन्हयातील चोरी गेलेला टाटा कंपनीचा आयचर ट्रक क्रमांक MH-26 H-8248 किमती 5,00000/- रुपये गोपनीय माहितीचे आधारे तपासाची चक्रे फिरवुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी अबु बकर महेबुब शेख वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा. इस्लामपुरा लातुर, ह.मु. वाजेगांव ता.जि. नांदेड यास तात्काळ ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातुन चोरी गेलेला ट्रक जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ. नरेद्र यालावार, हे करीत आहेत.