हिमायतनगर,अनिल मादसवार| शहर व परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र गेल्या तीन दिवसापासून पाऊस बेपत्ता झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. तर बहुतांशी शेतकऱ्याचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी वर्गाने चिंता व्यक्त केली होती. दरम्यान गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडला आहे.


यंदा हवामान केंद्राने चांगला पाऊस होईल उत्पादनात भरभराट येईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र यावर्षी मी महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक भागात नाले ओढे पुराच्या पाण्याने वाहू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळाला होता.


यंदा हवामान तज्ज्ञांनी चांगला पाऊस होईल अशी माहिती देऊन दिनांक १० ते १८ दरम्यान जोरदार पाऊस होईल असे भाकीत केले होते आणि हवामान विभागाने तास इशारा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग चालू केली. पेरण्या उरकल्या मात्र पाऊसाने पाठ फिरविल्याने शेतकरी आभाळाकडे हताश नजरेने पाहू लागला. होता दरम्यान दुबार पेरणीचे सनकोट उभे राहते कि काय अशी चिंता लागली असताना गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला असला तरी बियाणे पूर्ण उगवतील कि नाही या चिंतेत आहे.
