नवीन नांदेड l परभणी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोरील संविधान शिल्पाची माथेफिरूने तोडफोड करून अवमान केल्याचा निषेधार्थ काल झालेल्या या घटनेच्या 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करून निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कायदा व सुव्यवस्था दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी पाहणी करून पोलीस बंदोबस्त आढावा घेतला.
घटनेच्या निषेधार्थ सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले,प्रारंभी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ॲड.प्रेसनजीत वाघमारे,राजु लांडगे, पि.एस.गवळे,सम्राट आढाव,विलास गजभारे, एकनाथ वाघमारे,व्यंकट इंगळे,अभिमन्यू पंडित, विशाल बंटी गायकवाड, राहुल तारू,शुभम वाघमारे,दिलीप लांडगे, विशाल जौधंळे, धम्मा टोम्पें,डॉ.सचिन पवळे.
चंद्रकांत सावंत, कपील नरवाडे, संदीप महाबळे, किरण सोनसळे, अभिजित जमदाडे,तेजस निखाते,आदित्य लोहकरे,मनोज नवघरे,लखन जौधंळे, आकाश सुर्यवंशी, तेजस भिसे यांच्या सह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते, संविधान बचाओ ,व घोषणा देत अनुयायी यांनी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले व आरोपीला कठोर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी आंदोलनकर्ते यांनी संविधान फोटो व संवीधान हातात घेऊन सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत भंडे, उपनिरीक्षक चव्हाण,रोडे, व महिला पोलिस कर्मचारी, अंमलदार यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी ही सिडको हडको भागात कायदा व सुव्यवस्था अबांधित रहावा यासाठी पाहणी करून पोलीस बंदोबस्त आढावा घेतला.