Thursday, May 14

Tag: Protest at CIDCO to protest the Parbhani incident

CIDCO ; सिडको येथे परभणी घटनेचा निषेधार्थ आंदोलन,आरोपीवर कठोर कारवाई करा – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l परभणी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोरील संविधान शिल्पाची माथेफिरूने तोडफोड करून अवमान केल्याचा निषेधार्थ काल झालेल्या या घटनेच्या 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करून निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कायदा व सुव्यवस्था दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी पाहणी करून पोलीस बंदोबस्त आढावा घेतला. घटनेच्या निषेधार्थ सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले,प्रारंभी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड.प्रेसनजीत वाघमारे,राजु लांडगे, पि.एस.गवळे,स...
error: Content is protected !!