नवीन नांदेड l लोहा तालुक्यातील किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला, या मानाच्या कुस्तीची सुरूवात सचिन पाटील चिखलीकर,पंचायत समिती लोहा माजी सभापती आंनद पाटील शिंदे ढाकणीकर ,माजी सभापती शंकर पाटील ढगे , सरपंच प्रतिनिधी साईनाथ पाटील टरके,व मान्यवरांच्या,गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी झालेल्या शेवटच्या कुस्ती मध्ये यावर्षी किवळा येथील अच्युत टरके यांनी चौथ्यांदा मानाची प्रथम कुस्ती जिकंली यावेळी हलगीचा जोषात जल्लोष व्यक्त करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३१जानेवारी 25 रोजी हजरत शाह हुसेन मस्तान साहेब दर्गा किवळा ऊरूस शरीफ निमित्ताने रूद्रगिर गुरूदयाळगिर महाराज मठ संस्थान, ग्रामपंचायत कार्यालय किंवळा , तंटामुक्त समिती,सेवा सहकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी किवळा यांच्या वतीने कुस्ती दंगल आयोजन ३१ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील व तालुक्यातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला होता. पंच म्हणून निरंजन टरके, जगनाथ टरके,राजु टरके,वैभव जाधव, नामदेव मोकले,पंजाब टरके, निरंजन करके,प्रभाकर टरके,यांनी काम पाहिले, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती लोहा सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, ऊपसरपंच व्यंकट पाटील टरके,माजी सरपंच माधवराव पाटिल टरके टाकळगाव सरपंच भिमराव लामदाडे,वडगाव विनायक पाटील काळे,ग्रामपंचायत सदस्य विठलराव किवलेकर शाम अंभोरे, आंनदा गायकवाड, सुधाकरराव टाक, रविकिरण डोईफोडे, ग्रामविकास अधिकारी विशाल वडजे यांच्यासह मान्यवरांच्यी व किवळा गावातील गावकरी यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थितीत होती.

शेवटची कुस्ती सुरूवात झाल्यानंतर रोमहर्षक व थरारक होत असतांना काही मिनटातच सात हजार रुपयाची माळेगाव केसरी पहेलवान अच्युत दिगंबर टरके किवळा व ऊदगिर जिल्हा लातूर शरदपवार यांच्यात लढत झाली यात अच्युत दिगंबर टरके हे चौथ्यांदा विजयी झाले.

शंभर ते सहा हजार रुपये पर्यंतचा अनेक कुस्ती लावण्यात आल्या होत्या.यात विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवांनानी आखाडा गाजवुन व डावपेच आखात कुस्त्या जिंकल्या यात्रा कमेटीचे पंच , कमिटी सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांच्या सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. कुस्ती दंगल पाहण्यासाठी किवळा परिसरातील व लोहा कंधार नांदेड तालुक्यातील अनेकजण उपस्थित होते ,या वेळी जवळा बाजार येथील भालचंद्र रणशुर यांनी कुस्तीचे निवेदक म्हणून उत्कृष्ट रित्या निवेदन केले.
