नांदेड| भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या पुढाकारातून शहरातील श्रावस्ती नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. खर्या अर्थाने लोकशाहीची आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार करत असल्याचे मत पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी व्यक्त केले .

श्रावस्ती नगरीत पार पडलेल्या संविधान महोत्सवाला पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे महानगर कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर, देविदास राठोड, चैतन्य बापू देशमुख, प्रवीण साले , डॉ. सचिन उमरेकर, उमेश चव्हाण, विजय येवनकर, माजी महापौर मोहिनी यवनकर, किशोर स्वामी, दुष्यंत सोनाळे, राजू यन्नम, कैलास सावते, भी ना गायकवाड, लीना गायकवाड ,लक्ष्मी वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संविधान महोत्सवात सहभागी झालेल्या हजारो संविधान प्रेमी समोर बोलताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन देशावर महान उपकार केले आहेत . बाबासाहेबांचे हे ऋण फेडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील सर्वच घटकांचा समतोल विकास साधण्याच्या अनुषंगाने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच आज भारताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उजळ झालेली आहे.

शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार बंद झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ थेट मिळतो आहे. भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकार दमदारपणे काम करेल असा विश्वासही पालकमंत्री सावे यांनी व्यक्त केला . यावेळी संविधान महोत्सवाचे प्रास्ताविक संयोजक साहेबराव गायकवाड यांनी केले . माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे यांची समायोचीत भाषणे झाली.
