Sant Tukadoji Maharaj ; संत तुकडोजी महाराज त्यांचा बिलोलीतील मुक्काम प्रेरणादायी-एडवोकेट गोपाळराव बिलोलीकर

नांदेड l संत तुकडोजी महाराज यांचा बिलोलीतील मुक्काम प्रेरणादायी असाच होता. अशी आठवण विधीज्ञ गोपाळराव बिलोलीकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाचें औचित्य साधून हुतात्मा स्मारक येथे आयोजित “संवाद ज्येष्ठांसोबत…!” घेण्यात आला. ज्येष्ठांच्या आठवणी यावेळी प्रसारित करण्यात आल्या. ज्येष्ठांच्या आठवणी लिपीबद्ध करण्याचें यावेळी ठरले. आठवणी सांगताना एडवोकेट गोपाळराव बिलोलीकर पुढे म्हणाले की, पोलीस ॲक्शनचा काळ मला चांगला आठवतो. उर्दू शाळेवर हिंदुस्तानचा ध्वज फडकवण्यासाठी झालेला आक्रमकपणा त्यावेळी मी व माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांनी अनुभवला होता.

संत तुकडोजी महाराज यांच्या विषयी सांगताना ते पुढे असेही म्हणाले की, त्यांचा सहवास अत्यंत प्रेरणादायी असा होता. उंच धिपाड असे शरीर. महाळप्पा पटणे यांच्या घरापाठी मागील मैदानात संत तुकडोजी महाराज यांचे शिष्य *काठी कला* शिकवत असत. संत तुकडोजी महाराज यांचा सहवास स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांना तर लाभलाच, त्याचबरोबर मला आणि एडवोकेट चंद्रकांतराव बिलोलीकर यांनाही लाभला. त्यांच्या सहवासात आलेला अनुभव हा अत्यंत महत्त्वपूर्ण असाच होता.

ते पुढे असेही म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या शिष्याने शिकवलेली लाठी कला अनेकांना नंतर खूप उपयोगी ठरली. त्याचबरोबर यातील ज्यांनी कला शिकले त्यांनी पुढच्या पिढीला शिकवण्याचा प्रयत्न केलेला होता.. यावेळी एडवोकेट, पवार, बी पी नरोड यांनी अशा आठवणी लिपीबद्ध होण्याची गरज प्रगट केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button