Sant Tukadoji Maharaj ; संत तुकडोजी महाराज त्यांचा बिलोलीतील मुक्काम प्रेरणादायी-एडवोकेट गोपाळराव बिलोलीकर
नांदेड l संत तुकडोजी महाराज यांचा बिलोलीतील मुक्काम प्रेरणादायी असाच होता. अशी आठवण विधीज्ञ गोपाळराव बिलोलीकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाचें औचित्य साधून हुतात्मा स्मारक येथे आयोजित "संवाद ज्येष्ठांसोबत...!" घेण्यात आला. ज्येष्ठांच्या आठवणी यावेळी प्रसारित करण्यात आल्या. ज्येष्ठांच्या आठवणी लिपीबद्ध करण्याचें यावेळी ठरले. आठवणी सांगताना एडवोकेट गोपाळराव बिलोलीकर पुढे म्हणाले की, पोलीस ॲक्शनचा काळ मला चांगला आठवतो. उर्दू शाळेवर हिंदुस्तानचा ध्वज फडकवण्यासाठी झालेला आक्रमकपणा त्यावेळी मी व माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांनी अनुभवला होता.
संत तुकडोजी महाराज यांच्या विषयी सांगताना ते पुढे असेही म्हणाले की, त्यांचा सहवास अत्यंत प्रेरणादायी असा होता. उंच धिपाड असे शरीर. महाळप्पा पटणे यांच्या घरापाठी मागील मैदानात संत तुकडोजी महाराज यांचे शिष्य *काठी कला* शिकवत ...
