Sunday, June 28

Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

लोहा| तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयता सहावीसाठी जवाहर नवोदय मध्ये प्रवेश घेण्यासाठी पाच परीक्षा केंद्रावर शनिवारी (१३ डिसें) परीक्षा घेण्यात आली यात १ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १ हजार ५५७ विद्यार्थी उपस्थित होते व ७३ विद्यार्थी अनुउपस्थित होते परीक्षा सुरळीत पार पडल्या. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली.

लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात ४०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ३८२ विद्यार्थी उपस्थित होते केंद्रसचालक म्हणून शाळेचे प्राचार्य दिलीप बोधगिरे हे होते. कै विश्वनाथराव नळगे विद्यालयात ४०८ पैकी ३८७ विद्यार्थी हजर होते व २१ जण गैरहजर होते. केंद्रसचालक म्हणून मुख्याध्यापक अनिल हामदे यांनी काम पाहिले.

सह्याद्री इंग्लिश स्क्रुल गोल्डन सिटी लोहा शहर या परीक्षा केंद्रावर १६६ पैकी १५७ विद्यार्थी उपस्थित होते केंद्रसचालक म्हणून प्राचार्या श्रीमती अर्चना बोलकोणी होत्या ग्लोबल इंग्लिश या परीक्षा केंद्रावर केंद्र सचालक म्हणून प्राचार्य मनोजकुमार होते या केंद्रावर २४०पैकी २३४ विद्यार्थी उपस्थित होते. नारायणा इंटरनॅशनल स्कुल येथे ४०८ पैकी ३९७ विदयार्थ्यांनी परीक्षा दिली. प्राचार्य शिवाजी केंद्रे हे केंद्र संचालक होते. परीक्षा सुरळीत पार पदवी यासाठी गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांची नियुक्ती केली होती.

शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड , शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी डी आर शिंदे यांनी या पाचही परीक्षा केंद्रावर भेटी दिल्या स्वतः गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी पाहणी केली. केंद्रस्तरीय निरीक्षक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल आचणे, संदीप गायकवाड ,युवराज राजारूपे, मनोज कोटलवार हे परी नियुक्ती केलेल्या परीक्षा केंद्रावर कार्यरत होते.

जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रा.आंधोरीकार यांची विशेष नियुक्ती होती .परीक्षा केंद्रांना शिक्षणाधिकारी श्री दिलीप बनसोडे उपशिक्षणाधिकारी श्री पाचंगे तहसीलदार श्री विठ्ठल परळीकर , श्री जोशी यांनी भेटी दिल्या व पाहणी केली. परीक्षा समन्वयक राजकुमार चव्हाण व टीमने परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!