हिमायतनगर,अनिल मादसवार। ओबीसी योध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे दिनांक ०३ ऑगस्ट रोजी निषेध रॅली काढण्यात आली. शहरासह तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी १२ वाजता परमेश्वर मंदीरासमोर उपस्थित होऊन काळ्या पट्ट्या बांधून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करत झुंडशाही करणाऱ्या समाजकंठकांचा जाहीर निषेध केला.
मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष ओबीसी समुहाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दि. ३० रोजी सार्वजनिक रस्त्यवर गाठून मराठा जातीच्या गुंडानी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जीवघेणा हल्ला केला. सदरील घटना सोशल मिडीयावर प्रभावित करून त्याना बदनाम करण्याचे कटकारस्थान काही लोकांनी व समाजकंठकानी केल्याचे, ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी रैली काढण्यात येऊन श्री परमेश्वर मंदिरासमोर झुंडशाहीचे प्रतीकात्मक दहन करण्यात येऊन अहिर निषेध केला.
यावेळी दादागिरी नही चलेगी… नही चलेगी … नही चलेगी…. झुंडशाही नही चलेगी… नही चलेगी … नही चलेगी…. अश्या घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना Z + सुरक्षा देऊन हल्लेखोरांना त्वरीत अटक करा अशी मागणी ओबीसी समाज संघटणा तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, दिलीप राठोड, सुनील चव्हाण,प्रकाश हाके,रवी जोनापले,बाळु मुडगूलवाड,गजु बाचकलवाड,आनंदा मूतणेपवाड, सदाशिव सातव,पि.के . चव्हाण, दत्तराव हाके, साईनाथ आनमवाड, नितेश हाके, पांडुरंग आडे, बापूराव डूडुळे,माधव मेचेवाड, संतोष चव्हाण,रवी राठोड.लक्ष्मन ढानके,मारोती अकलवाड,शिवराम लिंगमपले, गणेश घोसलवाड, देसाई राऊलवाड. आदींसह ओबीसी समाज बांधवानी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.