Mla prataprao patil chikhalikar : जल जीवन योजनेच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटणार-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षापासून जल जीवन योजनेची कामे मोठ्या प्रमाणात बोगस व चुकीच्या पद्धतीने झालेली असून या कामामुळे विकास कामामध्ये मोठी अनियमितपणा आली आहे. या सर्व कामांची चौकशी व्हावी यासाठी लवकरच पाणीपुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी लवकरच करणार असल्याचे उद्गार लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील पाणीटंचाईच्या कृती आढावा बैठकीत काढले.

पंचायत समिती कंधार येथे १८ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पाणी टंचाई कृती आराखडा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा कंधार मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश पाटील,माजी जि प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे, बाबुराव गिरे, युवा नेते स्वप्निल पाटील लुंगारे, प्रा किशनराव डफडे, न.पा उपाध्यक्ष मनान चौधरी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बनसोडे, भगवानराव राठोड, डी.जी चंदनफुले, मधुकरराव डांगे, नगरसेवक जफर खान, महेश पिनाटे, पिंटू कदम, शेख आसिफ, मझर भाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी पंचायत समिती कंधारच्या वतीने आमदार चिखलीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की, कंधार पंचायत समितीची टंचाई कृती आढावा बैठक यावर्षी वेळेवर घेण्यात आली असून माझ्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे उत्कृष्ट आणि दर्जेदार झाली पाहिजेत चुकीचे कामे होऊ नये याची खबरदारी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी घ्यावी.

कामे करीत असताना अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामे केल्यास जनतेची हेळसांड होणार नाही. मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घेण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे व मतदार संघात पाणीपुरवठ्याच्या चांगल्या योजना झाल्या पाहिजेत. अधिकारी, पदाधिकारी सर्वांनी मिळून चांगले काम केल्यास मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.

मॉडेल प्रशस्त इमारत उभारणार
कंधार पंचायत समितीची इमारत ही अतिशय जीर्ण झाली असून पावसाळ्यामध्ये ही इमारत गळत आहे. लवकरच ही इमारत पाडून या ठिकाणी मराठवाड्यातील सर्वात चांगली व प्रशस्त मॉडेल अशी इमारत या ठिकाणी उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्याकरिता १५ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविला असून प्रस्तावातील काही त्रुटीची तात्काळ पूर्तता होताच या इमारतीचे लवकरच भूमिपूजन करू असे आश्वासन आमदार चिखलीकर यांनी यावेळी दिले.

तालुक्यातील मजरे धर्मापुरी येथील बोगस कामाच्या चौकशीसाठी समिती गठीत – कंधार तालुक्यातील मजरे धर्मापुरी येथील ७८ लक्ष रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन लोखंडे यांनी विद्यमान आमदार चिखलीकर यांच्याकडे आढावा बैठकीत केली. या तक्रारीची तात्काळ दखल घेत आमदार चिखलीकर यांनी उपविभागीय अधिकारी नरवटे, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता व जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता या त्रिस्तरीय कमिटीने चौकशी करून अहवाल आमच्याकडे लवकरच पाठवावा असे आवाहन करताच बोगस काम करणाऱ्या गुत्तेदार व कार्यकर्त्यांची धाबे दणाणली आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विलास नारनाळीकर, माजी अध्यक्ष गंगाधर कांबळे, संदीप घोरबांड, एन.डी.सोनकांबळे, दिगंबर गडपल्लेवार, जगदेव शिंदे, एम.बी शिंदे, विश्वनाथ केंद्रे यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button