श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| धकाधकीच्या या यंत्र युगात कुठेही जलद जाता येईल या करीता रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून रस्ते बांधकाम करण्यात येत आहेत. माहूर विभागात सुध्दा लोकप्रतिनिधिनी लाखों रुपये निधी खेचून आनला व रस्ते बांधकाम करण्यात आले,माहूर तालूक्यातील टाकळी चौफुल्ली ते लखमापूर डाबंर रस्ता उखडला व पहिल्या पावसातच खड्यामूळे पावसाने भरला आहे.


टाकळी चौफुल्ली ते लखमापूर चौफुल्ली या दोन कि.मी. डाबर रस्ता व तिन पूल करीता अडिच कोटी रुपए निधी दिला व दि १५.९.२०२४ रोजी कामा करीता उद्दघाटन करण्यात आले,व तो एप्रिल २०२५ रोजी पूर्ण झाला,आज रोजी त्या रस्त्यांवर गड्डे पडत आहेत. तालूक्यात या दोन वर्षात झालेले डाबर रस्ते मात्र अल्पावधीतच बर्याच रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पहावयास मिळत असुन आता रस्ते कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असून रस्ते गुणवत्ता तपासणाऱ्या यंत्रणेला वरदहस्त कुणाचा ? याबद्दल तालुक्यात बोलल्या जात आहे.


ग्रामीण भागात नवीन रस्ते होणार म्हणजे प्रवास सुखकर होईल या भावणेने आनंद होणे स्वाभाविकच आहे. मात्र नवीन रस्ते बांधणे आणि रस्त्यांची डागडुजी ही नित्याचीच बाब झाली आहे.दोन वर्षा पुर्वी वडसा ते नागोबा मंदिर रोड झाला.तसेच वाई बाजार ते हरडप पर्यंत केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण कामाला केवळ वीस ते पंचवीस दिवस पूर्ण झाले होते. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पहिल्याच अवकाळी पावसात डांबरीकरण रोड खचल्याने सोशल मिडियावर तो व्हायरल केला होता. ह्या कामांचे कौतुकही झाले. मात्र पावसाळा सूरु होताच वर्षभरातच हा रस्ता उखडला असे तालूक्यात अनेक उदाहरण आहेत.

शासनाने ज्यांच्यावर कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी सोपविली आहे ते कामाच्या गुणवत्ते पेक्षा कशावर नजर ठेऊन असतात, हा प्रश्न मात्र या ठीकाणी अनुत्तरित आहे. लोकप्रतिनिधिनी व सर्व यंत्रनानी आपली कामे गुणवत्ता पुर्ण करून मुल्यमापन गांभिर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
