श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंप (त्रिमूर्ती फिलींग सेंटर) समोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारने दिलेल्या जबर धडकेत रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेल्या एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावल्याची (A bull lost its life due to the negligence of Mahur Nagar Panchayat, while the car driver narrowly escaped unhur) घटना दि.४ जूलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.


शहरातील नागरिकांनी वारंवार सूचना व तक्रारी करूनही तसेच युवासेना शहर प्रमुख विजयसिंह हजारी यांनी यासंदर्भात दि. २५ जून रोजी लेखी निवेदन देऊनही शहरातील मुख्य महामार्गावरील मुक्त संचारासह ऐण रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांचा कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त केला. नसल्याने गाडी क्र. एम एच २४ व्हि ११२१ या क्रमांकाच्या एका स्विफ्ट डिझायर कारने एका वळूस जोरदार धडक देऊन जवळपास शंभर फूट फरफट नेले सुदैवाने चालकाला काही झाले नाही, मात्र वळूचा जखमी अवस्थेत तडफडून जागीच मृत्यू झाला. बजरंगदल च्या कार्यकत्यांनी वळूचा अत्यविधी केला.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन आजवर अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून, या मार्गावर आणखी एखादी गंभीर अपघाताची घटना घडून मोठी जीवीतहानी होण्याआधी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने या महामार्गावरील मोकाट जनावरांचा मुक्त संचार व ठाण मांडून बसण्यावर उचित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.माहूर नपचे मुख्याधिकारी हे मुख्यालई राहत नसून नांदेड वरून कधी कधी ये-जा करतात त्यामुळे कर्मचारी वर्गावर त्याचे नियंत्रण राहिलेले नाही ह्यामुळेच असा घटना घडत असल्याची चर्चा नागरिक करत आहे
