नांदेड| सामाजिक चळवळीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलाच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्याची धुरा सांभाळणारे सकल मराठा समाजाचे मराठा सेवक म्हणून सर्वपरिचित असणारे मराठाच नाही तर सर्वसामान्यांच्या गरजवंतांच्या गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी कुठलीही संघटना, कुठलेही पक्ष, कुठलाही पद नसताना 24 तास सर्वांसाठी तत्परतेने हजर असणारे सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक ,प्रशासकीय क्षेत्र कुठलेही असो. या व्यक्तीकडे गेल्या की, काम शंभर टक्के होणारच असा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्यांना पाहून निर्माण झालाय ज्यांची धडपड त्यांची कार्य पाहून अनेक तरुण समाजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहेत.


आपणही समाजाची काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने समाजासाठी झटणारे मराठा सेवक श्याम पाटील वडजे (The abhishtachintan ceremony of Maratha servant Shyam Patil Vadje) यांचे अभिष्टचिंतन सोहळा सगळ्या जिवाभावाच्या माणसानी सामाजिक दायित्व निभावतच साजरा करण्याचा निर्णय घेतला. वाढदिवस म्हणजे सामाजिक उपक्रमांची नांदि ठरला. काल श्याम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त श्रीक्षेत्र काळेश्वर दुग्धाभिषेक संस्थांच्या वतीने सत्कार सोहळा त्याचबरोबर जिजाऊ नगर वाडी पाटील श्री साईबाबा मंदिर दर्शन ,वस्ताद लहुजी साळवे अनाथ आश्रम येथे फळवाटप, छत्रपती शाहू मतिमंद विद्यालय कंधार येथे शालेय साहित्य,वृक्षारोपण व खाऊ वाटपाचा कार्यक्रम, उप ग्रामीण शासकीय रुग्णालय लोहा येथे फळ वाटप कार्यक्रम ,सुमन बालगृह अन्नदान ,संध्या छाया वृद्धाश्रम येथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले .राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नांदेड शहरात उभारलेल्या भव्य अशा जिजाऊसृष्टीस वाढदिवसानिमित्त अभिवादन करून दिवसभर सामाजिक, राजकीय, वैद्यकीय ,शैक्षणिक, पत्रकारिता ,व्यावसायिक ,शेतकरी, तरुण युवक आदी स्नेहीजनांच्या भेटी घेण्यात आल्या.


तसेच मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर ,नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, आंतरवाली चे सरपंच पांडुरंग तारख,मनोज पाटलांचे सहकारी श्रीराम कुरनकर, गंगाधर काळकुटे पाटील, प्रदीप दादा सोळुंके मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब,मनोज जरांगे पाटलांचे सोशल मीडिया सांभाळणारी टीम अमोल तोर,उदय भिसे, डीजे रॉक या सर्वांनी फोनवर शुभेच्छा दिल्या असे समजले.


एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या माणसाला सामाजिक चळवळीत काम करत असताना आयुष्यात मनःभवातून मार्गदर्शन करणाऱ्या या विषयात धडा शिकवणारे अशी माणसे भेटली आणि सर्वांच्या सहवासाने श्याम पाटील यांना कार्य करण्यासाठी बळ मिळत भावा सारखा जीव वळून टाकणाऱ्या जिवलगानी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे दायित्व वाढदिवसाच्या निमित्याने निभावण्याचे काम सहकाऱ्यांनी माझ्या हातून घडून आणले. सामाजिक चळवळीत काम करत असताना माय माऊल्यांनी सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला विश्वासाची पांगर माझ्यावर घातली याने मी खरच मी शब्द झालोय! समाजाचे ऋण फेडताना निर्माण झालेली ही नाते मी निभावणार माझे स्नेही जन ,जीवाभावाची माणस हीच माझी खरी संपत्ती आहे. याचे मी कायम जतन करणार अशा भावना आभार व्यक्त करताना श्याम पाटील वडजे यांनी व्यक्त केल्या. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा हजारो बांधवानी भेटुन तर काही राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील विविध मान्यवरांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राजेश हंबर्डे, भास्करराव हंबर्डे पाटलाचं काळीज ग्रुपचे अध्यक्ष ऋषी पाटील वानखेडे,सुधीर देशमुख तरोडेकर , संभाजी ब्रिगेडचे कंधार तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे मराठा सेवक नंदाजी इंगळे, योगेश कदम, बालाजी नावंदे,जनार्दन शेजुळे जोगदंड, बाजी प्रताप, सुरज सुरोशे,हरिदास पाटील जाधव, आनंद जाधव ,संभाजी भोसले ,शरद जाधव ,महेश शिंदे ,अनिल उमरेकर, बंडू पाटील मारतळेकर, संतोष भोसले, शिव शंकर भोसले ,आनंद सवराते, वामन सवराते,शिवम बोकारे,गोविंद दुगावे, मदन काळे, संतोष गुट्टे, शिवानंद वानखेडे, महेश वडजे, दत्ता खराटे, गजानन कहाळेकर, दत्ता शिंदे, सौ.सुचिता जोगदंड–वडजे आदींनी परिश्रम घेतले.