नांदेड| आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहर काँग्रेसकडून व्यापक नियोजन आखण्यात आले असून, प्रभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या विशेष उपस्थितीत सिडको वाघाळा प्रभाग क्र. विसची आढावा बैठक शुक्रवार (दि.४) रोजी हडको येथे घेण्यात आली. यावेळी मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने सखोल चर्चा करत संघटनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.


आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून सुक्ष्म नियोजन केले जात आहे. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आता प्रभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनात, सिडको वाघाळा प्रभाग क्र. २० ची आढावा बैठक शुक्रवार (ता.४) रोजी हडको येथे घेण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकारी व वरिष्ठांमध्ये नियोजना संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पावडे, श्याम दरक, ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, मसुद खान, आनंद चव्हाण, बालाजी चव्हाण, शमीम अब्दुला, महेश देशमुख तरोडेकर, जे. पी. पाटील, मुंन्तजीब, शेर अली खान, अजीज कुरेशी, बापूसाहेब पाटील, सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, गगन यादव, वाजीद अन्सारी, दीपक सिंग हुजिरिया, नसीमा खान, डॉ. करुणा जमदाडे, पी.एस.गवळी, भारती रणवाडे, वंदना मगरे, महेश शिंदे, ज्योती कदम, प्रसेनजित वाघमारे, डॉ. अशोक कलंत्री, लतिफ शेख, देविदास कदम, संजय कदम, शेख मोईन लाठकर, शंकर गव्हाणे, किशन रावनगावकर, माणिक श्रोते, देविदास कहाळेकर, अजय गालेवाड, भुजंग स्वामी, नरुद्दीन शेख, भगवान जोगदंड, आनंदा गायकवाड, शशिकांत जोंधळे, तुकाराम झडते, चित्ते मावशी, ढवळे मावशी आदीसह प्रभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
