Shyam Patil Vadje : सामाजिक उपक्रम राबवत मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
नांदेड| सामाजिक चळवळीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलाच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्याची धुरा सांभाळणारे सकल मराठा समाजाचे मराठा सेवक म्हणून सर्वपरिचित असणारे मराठाच नाही तर सर्वसामान्यांच्या गरजवंतांच्या गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी कुठलीही संघटना, कुठलेही पक्ष, कुठलाही पद नसताना 24 तास सर्वांसाठी तत्परतेने हजर असणारे सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक ,प्रशासकीय क्षेत्र कुठलेही असो. या व्यक्तीकडे गेल्या की, काम शंभर टक्के होणारच असा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्यांना पाहून निर्माण झालाय ज्यांची धडपड त्यांची कार्य पाहून अनेक तरुण समाजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहेत.
आपणही समाजाची काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने समाजासाठी झटणारे मराठा सेवक श्याम पाटील वडजे (The abhishtachintan ceremony of Maratha servant Shyam Patil Vadje) यांचे अभिष्टचिंतन सोहळा सगळ्...
