Savitribai Phule Secondary School ; सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा थाटात संपन्न – NNL

नांदेड | श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड घ्या मैदानावर दि.08 ऑक्टोबर 24 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, या विभागीय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर सहसचिव श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड,तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मा. अँड.उदयराव निंबाळकर कोषाध्यक्ष श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड हे उपस्थित होते.तर तालुका क्रीडा अधिकारी संजय बेतीवार शाळेचे मुख्याध्यापक एम.डब्ल्यू, कल्याणकर पर्यवेक्षिका सौ.एस.टी. पावडे उपस्थित होते.या उद्घाटकीय कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन,तसेच मान्यवरांचा सत्कार व स्वागतानंतर झाली.

या विभागीय स्पर्धेसाठी मराठवाड्या तील धाराशिव, लातूर व नांदेड या जिल्ह्यातील 14, 17 व 19 वर्षा खालील मुला मुलींचे तब्बल 30 संघ व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार. डी.पी.सावंत यांनी या स्पर्धेचे नारळ फोडून व टॉस करून या विभागीय स्पर्धेला सुरुवात केली व उद्घाटन केले. त्यांच्यासोबत संस्थेचे सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर ,संस्थेचे कोषाध्यक्ष अ़ँड. उदयराव निंबाळकर, तालुका क्रीडा अधिकारी संजय बेतीवार शाळेचे मुख्याध्यापक एम.डब्ल्यू. कल्याणकर ,पर्यवेक्षिका सौ.एस. टी.पावडे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक एम. डब्ल्यू. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक जमदाडे यांनी केले.

प्रास्ताविक भाषणत शाळेचे मुख्याध्यापक एम.डब्ल्यू.कल्याणकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे, स्पर्धेचे पंच, तसेच खेळाडूंचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे स्वागत केले व भविष्यामध्ये निश्चितच अनेक विद्यार्थी विभागीय तसेच राज्य पातळीवरचे खेळाडू ठरतील असा मनोदय व्यक्त केला व या स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या विभागीय स्पर्धा घेण्यासाठी शाळेने मैदान उपलब्ध करून दिल्या बद्दल तालुका क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी संस्थेचे सचिव डी. पी. सावंत यांचे व शाळेचे आभार मानले.
उद्घाटकीय भाषणात माजी मंत्री सावंत म्हणाले की विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती जोपासावी व विविध खेळात सहभाग घेऊन राज्य पातळीवर तसेच देश पातळीवरही घवघवीत यश संपादन करावे असा अनमोल सल्ला त्यांनी उपस्थित खेळाडूंना दिला.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. शेंदारकर म्हणाले की मैदानी खेळामुळेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घडत असते म्हणून खेळात सहभागी व्हा व यश मिळवा असे सांगितले. मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रा. रमेश नांदेडकर यांनी मानले तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रे एस.जी.यांनी केले. या स्पर्धेवेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विविध जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी, खेळाडू स्पर्धक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button