HomeनांदेडIndira Gandhi Housing Society in Hadko ; हडको परिसरातील इंदिरा गांधी गृहनिर्माण...

Indira Gandhi Housing Society in Hadko ; हडको परिसरातील इंदिरा गांधी गृहनिर्माण संस्था अंतर्गत दहा घरांना नळ कनेक्शन नसतांना लाखोंची बिले, पाणी पुरवठा विभागाचा अजब गजब कारभार – NNL

नवीन नांदेड| सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा विभागाने इंदिरा गांधी गृह निर्माण संस्था अंतर्गत अनेक मालमत्ता धारकांना नळ कनेक्शन नसतांना नळपटी आकारणी करत गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते दहा मालमत्ता धारकांना जवळपास लाखो रूपये देयक दिले असून वेळोवेळी अनेक निवेदनाद्वारे मागणी करून न्याय न मिळाल्याने मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करून संबधित आकारणी करण्यात आलेली नळपटी बिले रध्द करण्याची मागणी केली आहे.

मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत इंदिरा गांधीं गृहनिर्माण संस्था हडको येथील मालमत्ता धारक असलेल्या आठ ते दहा जणांनी गेल्या 2003 पासून आम्हाला पाणी पुरवठा होत नसतांना पाणी पट्टी देयक आकारणी केली असल्याचे सांगितले, व निवेदनाद्वारे रध्द करण्याची मागणी केली, परंतु वर्षाला संबधित विभागाने देयक आकारात जवळपास 21 वर्षाच्ये पाणी पटी देयक एक लाखाच्या वर आकारून संबधित वसुली लिपीका मार्फत देण्यात आले आहे.

मालमत्ता धारकांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय धाव घेतली, परंतु मुख्य कार्यालय पाणी पुरवठा विभागात जा असा सल्ला मिळाला,यात गेल्या काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाने या भागात सर्व्हेक्षण केले,पाहणी केली, परंतु वर्षाला बिल वाढतच गेले अखेर संबधित मालमत्ता धारकांना 1 लाख वर गेल्याने अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मालमत्ता धारक गोपीनाथ कहाळेकर, गणेश राठोड, रेणुका गोविंदराव मेटकर,शेष्रादी मंचेवार, यांनी आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी करून नळपटी बिले रध्द करण्याची मागणी केली आहे, या निवेदनाचा प्रति अभियंता पाणी पुरवठा व सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे देण्यात आल्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments