Savitribai Phule Secondary School ; सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा थाटात संपन्न – NNL
नांदेड | श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड घ्या मैदानावर दि.08 ऑक्टोबर 24 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, या विभागीय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर सहसचिव श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड,तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मा. अँड.उदयराव निंबाळकर कोषाध्यक्ष श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड हे उपस्थित होते.तर तालुका क्रीडा अधिकारी संजय बेतीवार शाळेचे मुख्याध्यापक एम.डब्ल्यू, कल्य...
