कृषीनांदेड

BBF technology : सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशिर- डॉ. भेदे

नांदेड| विकसित कृषि संकल्प अभियानाच्या अकराव्या दिवशी लोहा तालुक्यातील बामणी, जानापुरी, सोनखेड, टेळकी, दापशेड व शेळगाव येथे महत्वपूर्ण कृषी कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात डॉ. भेदे यांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी बीबीएफ तंत्रज्ञानाचे महत्व विषद केले. त्यांनी स्पष्ट केले की या तंत्रज्ञानामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. तसेच उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात कृषी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूरचे राहुल डमाळे, ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे डॉ. भेदे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभुरे आणि बालाजी चंदापूरे हे तज्ज्ञ उपस्थित होते.

बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये साठवले जाते. ज्यामुळे मृदा संवर्धन आणि जलसंधारण होते. तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पिकाचे नुकसान टाळता येते. या तंत्रज्ञानाचा उपयोग सोयाबीन, तूर, कपाशी, हळद आणि इतर पिकांसाठी केला जातो. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाच्या वापराविषयी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून देशभरातील 1.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांपर्यत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

चिकू, लिंबू आणि सीताफळ या पिकांचीही चर्चा या कार्यक्रमात करण्यात आली. चिकू दमट हवामान यासाठी उत्तम, गोडसर आणि पोषणमूल्यांनी समृद्ध. लिंबू :- व्हिटॅमिन सी ने भरपूर, विविध प्रकार उपलब्ध. सीताफळ कोरडवाहू पीक, उत्तम निचरा असलेल्या जमीनीसाठी योग्य. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करुन उत्पादन वाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व तज्ज्ञांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button