Friday, May 15

Tag: for soybean cultivation

BBF technology : सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशिर- डॉ. भेदे

BBF technology : सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशिर- डॉ. भेदे

कृषी, नांदेड
नांदेड| विकसित कृषि संकल्प अभियानाच्या अकराव्या दिवशी लोहा तालुक्यातील बामणी, जानापुरी, सोनखेड, टेळकी, दापशेड व शेळगाव येथे महत्वपूर्ण कृषी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉ. भेदे यांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी बीबीएफ तंत्रज्ञानाचे महत्व विषद केले. त्यांनी स्पष्ट केले की या तंत्रज्ञानामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. तसेच उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात कृषी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूरचे राहुल डमाळे, ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे डॉ. भेदे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभुरे आणि बालाजी चंदापूरे हे तज्ज्ञ उपस्थित होते. बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्य...
error: Content is protected !!