भोकर| सेवा समर्पण परिवार च्या वतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असल्याचे माहिती सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिली.
सेवा समर्पण परिवार च्या वर्धापन दिनानिमित्त मागील तीन वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यावर्षी मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा समर्पण पुरस्कार आणि गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी आणि गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना राज्यस्तरीय महिला विकास सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.३ जानेवारी रोजी श्री शाहू महाराज विद्यालय भोकर येथे होणाऱ्या २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनात खा. रविंद्र चव्हाण, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे, ना. हेमंत पाटील, आ. राजेश पवार, आ. रामराव पाटील (म्हैसा) स्वागताध्यक्ष शिरिष देशमुख गोरठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या वेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास देशमुख, बाळासाहेब पाटील रावणगावकर, मारोतराव कवळे, गोविंदराव सिंधीकर, डॉ यु. एल. जाधव, नं. द. तुप्तेवार, प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण, संजीव कुळकर्णी, प्रकाश भिलवंडे, प्रभाकर कानडखेडकर, नामदेव आयलवाड, पृथ्वीराज तौर, गोविंद पा. गौड, सुरेश बिल्लेवाड, पांडुरंग देशमुख, सुधीर गुट्टे, गणेश कापसे, अशोककुमार मुंदडा यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समर्पण परिवार च्या वतीने करण्यात आला आहे.