किनवट, परमेश्वर पेशवे| परभणी शहरात घडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रकरणी घडलेल्या निंदनीय घटनेच्या विरोधात किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरांमध्ये इस्लापूर शहर कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. व इस्लापूर येथील शिवाजी चौकामध्ये निषेध सभेचे आयोजन दिनांक 14 रोजी करण्यात आले होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
याप्रसंगी संविधानाच्या संदर्भात घडलेल्या निंदनीय प्रकाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनेची पदाधिकारी पत्रकार बांधव आंबेडकर प्रेमी व विविध समाजातील शेकडो तरुण युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात घडलेल्या घटनेच्या संदर्भात डॉक्टर भगवान गंगासागर, प्रभाकर बोडेवाड, विठ्ठलराव गटपाळे, मारुती शेळके, दत्ता गडलवाड, परमेश्वर पेशवे, प्रकाश कारलेवाड, यांनी या घटनेच्या संदर्भात तीव्र शब्दात मत व्यक्त करून निषेध नोंदवला. व ही घटना ज्या समाजकंटकाकडून घडली असेल किंवा घडवल्या गेली असेल त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी केली.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
याप्रसंगी परिसरातील शिवनी, भिशी, कोल्हारी कोसमेट, येथील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कसबे यांनी केले. यानंतर इस्लापूर येथील बस स्थानकापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत भव्य स्वरूपात रॅली काढून घोषणाबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी या घटने संदर्भात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. व पूर्णतः शांततेमध्ये ही निषेध सभा व रॅली पार पडली.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)