Thursday, May 14

Blanket Distribution Initiative : नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते “मायेची ऊब ” हा २०२५ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ -NNL

नांदेड| रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून सतत सातव्या वर्षी “मायेची ऊब ” हा २०२५ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ नांदेडभूषण संतबाबा बलविंदर सिंघजी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून आगामी चाळीस दिवस दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यावर फिरून ब्लॅंकेट वितरित करण्यात येणार आहेत.

भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगीनाघाट नांदेड येथे बाबाजींच्या हस्ते रथाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून हा उपक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर हे सातत्याने निरपेक्षपणे करत असलेल्या विविध सेवाकार्याचे कौतुक केले.

IMG 20241214 WA0002 1 Blanket Distribution Initiative : नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते "मायेची ऊब " हा २०२५ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ -NNL

लायन्स अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी असे सांगितले की, यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी १२८५ ब्लॅकेटची आवश्यकता असल्यामुळे दानशूर नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.यावेळी बाबा सुबेकसिंघ,ज्येष्ठ समाजसेवक सितरामजी जाजू,प्रमिला भालके, लायन्स कोषाध्यक्ष दीपेश छेडा, दत्तप्रसाद येंगुलदास,सुभाष मामिलवाड, प्रियंका कदम ,अपर्णा शर्मा,प्रणिता देशमुख यांच्या हस्ते सव्वादोनशे गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.अरुण काबरा,कामाजी सरोदे,सुरेश शर्मा, सविता काबरा यांनी मोत्याची माळ देऊन सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवा लोट यांनी तर आभार राजेशसिंह ठाकूर यांनी मानले.रुपेश वट्टमवार,नांदेड जनरल ट्रेडर्स असोसिएशन,ॲड.दिलीप ठाकूर, चंद्रकांत गंजेवार, डी.एच.अग्रवाल, महेश भालके, शिवाजीराव शिंदे,

हेनित रोहित मुत्तेपवार अमेरिका, अशोक पडगिलवार, स्नेहलता जायस्वाल हैदराबाद,पवन ट्रेडर्स नांदेड, डॉ.संदीप बी. ढगे मुखेड,सौ.लीला सितारामजी जाजू,सौ.स्नेहल संजय जाजू, ओमप्रकाश पाम्पटवार,कुसुमश्री परिवार मुक्ताईनगर,श्रीकांत कुलकर्णी,डॉ.वैष्णवी राजेश काबरा,अज्ञात दाता,डॉ. राजेंद्र मुंदडा,सदानंद मेडेवार, मनोज चौधरी, प्रा.प्रभाकर उदगीरे,नित्या चैताली अक्षय चिंतावार पुणे,नव्या अर्पिता सौरभ रुद्रावार सिंगापूर, शिवराज विंचुरकर,श्रेया व श्रेयस साखरे,मोहित जयप्रकाश सोनी, सोनाली वारले,अविनाश चिंतावार यांनी ब्लॅंकेट साठी देणगी दिलेली आहे.

IMG 20241214 WA0003 Blanket Distribution Initiative : नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते "मायेची ऊब " हा २०२५ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ -NNL

लुधियाना येथील कारखान्यातून घाऊक स्वरूपात ब्लॅंकेट मागण्यात येत असून एका ब्लॅंकेटचे वजन एक किलो पेक्षा जास्त आहे. एका ब्लॅंकेट ला रबर प्रिंटसह दोनशे रुपये शुल्क लागणार आहे.वीस ब्लॅंकेट साठी चार हजार रुपये खर्च येणार आहे.ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंट द्वारे ब्लॅंकेट वर टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.

समाज माध्यमाद्वारे ब्लॅंकेट देणाऱ्या दानशूर नागरिकांची यादी उपक्रम संपेपर्यंत दररोज प्रसिद्ध करण्यात येणार असून चाळीस हजार नागरिकापर्यंत पोंहचणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर कदम, प्रसाद देशपांडे,रोहन यादव,भोला धुमाळ,हरी यादव,संतोष भारती,दिगंबर रूमने,नरसिंह द्रौपदीवार, कपिल यादव, कैलास बरंडवाल, दत्ता पाटील यांनी परिश्रम घेतले.गेल्या सहा वर्षापासून मायेची ऊब हा उपक्रम राबवल्यामुळे नांदेड शहरातील एकाही निराधाराचा थंडीमुळे मृत्यू झाला नसल्याने दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!