नवीन नांदेड l राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य सेवाभावी संस्था सिडको नांदेड संचलित गुरुकृपा निवास कोचिंग क्लासेस आयोजित गुरुदेव जीवनगौरव पुरस्कार सोहळा हडको नांदेड येथे 19 जानेवारी रोजी संपन्न झाला.

समारंभाचे अध्यक्ष म्हणून आचार्य गुरुराज स्वामी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ष.ब्र. १०८ महादेव शिवाचार्य स्वामीजी मठाधिपती मठसंस्थान कळमनुरी यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून सेवा जनशक्ती पार्टीचे राज्य प्रवक्ते विठ्ठलराव ताकबिडे यांच्यासह प्रमुख मान्यवर म्हणून वैजनाथराव देशमुख, धीरज स्वामी, विनोद कांचनगिरे यांच्यासह गुरुदेव मित्र मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक यांची उपस्थिती होती. समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.प्रा.चंद्रशेखर बाबाराव शिराळे यांनी प्रास्ताविक केले.

माहेश्वरमूर्ती सद्गुरु वीरभद्रेश्वर महाराज येलूरकर, हरिभक्ती परायण गोदावरी मुंडे गंगाखेडकर,शिवभक्ती परायण मारोतराव नेळगे खेडकर वाडीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एल.माचलोड, शिवभक्ती परायण सोनबा शिराळे गुरुजी,डॉ.हंसराज वैद्य यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी आचार्य गुरुराज स्वामी म्हटले की,”डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांच्या आशीर्वादाने प्रा. चंद्रशेखर शिराळे यांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्यास राष्ट्रसंतांचा मंगलमय आशीर्वाद आहे आणि आमच्या शुभेच्छा आहेत “याबरोबरच महादेव शिवाचार्य स्वामीजी यांनी म्हटले की “ज्या व्यक्तींनी जीवनामध्ये महान कार्य केले आहे शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक धार्मिक कार्याने जे लोक शोभून गेले आहेत.

त्यांना जीवनगौरव पुरस्कार देणे म्हणजे जणू राष्ट्राचा गौरव करणे होय, अशा सर्व गुरुदेव जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मान्यवरांना खूप शुभेच्छा व मंगल आशीर्वाद” याबरोबरच याप्रसंगी पुरस्काराला उत्तर म्हणून डॉ. हंसराज वैद्य, यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना “आई-वडिलांची गाणी गायली महानता सांगितले आणि हा पुरस्कार आजपर्यंतच्या आपल्या प्राप्त झालेल्या शेकडो पुरस्कारापैकी सर्वश्रेष्ठ असल्याचे नमूद केले”. याप्रसंगी हरिभक्ति पारायण गोदावरी मुंडे यांच्या सुश्राव्य भजनाने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले व इतर सर्व जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह सेवा जनशक्ती पार्टी प्रवक्ते विठ्ठलराव ताकबिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भक्तीरसात नाहून निघालेल्या या कार्यक्रमात कु.गायत्री शिराळे व चि. मनमथ सरकाळे यांनी स्वागत गीत गायले,कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन साहित्यिक प्रा.धाराशिव शिराळे, संजय काचावार यांनी केले तर आभार प्रा. महाजन यांनी मानले व मोठ्या उत्साहात हजारो भक्तगणांच्या उपस्थिती गुरुदेव जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.