Gurudev ; गुरुदेव जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
नवीन नांदेड l राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य सेवाभावी संस्था सिडको नांदेड संचलित गुरुकृपा निवास कोचिंग क्लासेस आयोजित गुरुदेव जीवनगौरव पुरस्कार सोहळा हडको नांदेड येथे 19 जानेवारी रोजी संपन्न झाला.
समारंभाचे अध्यक्ष म्हणून आचार्य गुरुराज स्वामी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ष.ब्र. १०८ महादेव शिवाचार्य स्वामीजी मठाधिपती मठसंस्थान कळमनुरी यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून सेवा जनशक्ती पार्टीचे राज्य प्रवक्ते विठ्ठलराव ताकबिडे यांच्यासह प्रमुख मान्यवर म्हणून वैजनाथराव देशमुख, धीरज स्वामी, विनोद कांचनगिरे यांच्यासह गुरुदेव मित्र मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक यांची उपस्थिती होती. समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.प्रा.चंद्रशेखर बाबाराव शिराळे यांनी प्रास्ताविक केले.
माहेश्वरमूर्ती सद्गुरु वीरभद्रेश्वर महाराज य...
