नांदेड| तालुक्यातील अर्जापुर येथील कै. जयराम आंबेकर विद्यालयाच्या (Kai.Jairam Ambekar Vidyalaya) वतीने दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अर्जापुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गंगाधरराव पटने यांची तर बिलोलीली च्या उप विभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. यासोबतच ज्येष्ठ पत्रकार तथा प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर, पानसरे महाविद्यालयातील मराठी विभाचे प्रा. गोपाळ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी देगलूर तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता कै. जयराम आंबेकर विद्यालय अर्जापुर येथे पार पडणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कै. जयराम आंबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष देगलूरकर यांनी केले आहे.
