श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून आणि मठाधीपती द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी श्री.दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे.याची सुरुवात दि.९ डिसेंबर ते सांगता दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल दि.१३ डिसेंबर ला आश्रमाकडून श्री.संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान यानिमित्त माहूर शहरांमध्ये सकाळी राबविण्यात आले. त्यात श्री.आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती व अनुयायांसह ग्रामस्थ उत्साहात सहभागी झाले होते.
माहूर शहरातील प्रमुख मार्गाने टी पॉइंट,बस स्थानक परिसर,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक, ग्रामीण रुग्णालय, चक्रधर स्वामी नगर या प्रमुख मार्गाने माहूर शहरातून स्वच्छता रॅली व गुरु दत्तात्रेय महाराज यांची पालखी सोहळा सर्व माहूरकरांनी अनुभवला.यावेळी शहरातील प्रत्येक नामफलकाचे पुष्पहार घालून महाराजांकडून पुजन करण्यात आले तसेच प्रत्येक चौकावर द.भ.प. सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
स्वच्छता उपक्रमात स्थानिक, भाविक आणि पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीआबादी येथेही स्वच्छता अभियान राबविले.स्वच्छता रॅली शाळेच्या परिसरात आल्यानंतर शाळेच्या वतीने द.भ.प.सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांचा येथोचीत सन्मान करण्यात आला. त्यावेळी अनेक भक्तगण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दत्त जयंती उत्सवाची सांगता रविवारी रक्तदान शिबिराने होणार असून सदर स्वच्छता रॅलीच्या यशस्वीते करिता आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर, जवाहरलाल जयस्वाल,पुंडलिक हुंबे, एस.एस. पाटील, सुधीर जाधव, लक्ष्मण ढगे, वैभव खराटे, रमेश तमखाने,ठोंबरे कारभारी,बालाजी जाधव, अविनाश ताटेवार , गजानन मुकाडे, अविनाश हुलकाने यांच्यासह अनेक तरुण व ग्रामस्थांची उपस्थिती होती.