Declaration of Service Dedication Family : राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार; सेवा समर्पण परिवारची घोषणा – NNL
भोकर| सेवा समर्पण परिवार च्या वतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असल्याचे माहिती सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिली.
सेवा समर्पण परिवार च्या वर्धापन दिनानिमित्त मागील तीन वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यावर्षी मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा समर्पण पुरस्कार आणि गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी आणि गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना राज्यस्तरीय महिला विकास सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, मानपत्...
