Ramzan : दहा वर्षीचे जुळवा मुले सय्यद हसन. सय्यद हसनैन यांचा आयुष्यातील पहिला रोजा व (उपहास) पुर्ण संपन्न

नायगाव l मुस्लिम इस्लाम धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला दोन मार्च पासून सुरूवात झाली असून नायगाव तालुक्यातील नरसी येथील सय्यद हसन अजिम. सय्यद हसनैन अजिम या दोन जुळवा दहा वर्षीय चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.

रमजान महिन्यात महीला पुरुष यांच्या सह लहान चिमुकुले सुद्धा रोजा (उपवास) ठेवतात यावर्षी दोन मार्च पासून रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे तरीपण या वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना सय्यद हसन.सय्यद हसनैन या दोन चिमुकल्याने पहीला रोजा पुर्ण केला चौदा तास अन्न पाण्याचा त्याग करून रोजा (उपवास) पुर्ण केला जातो व पुर्ण महीना तरावीह मध्ये कुरान पठन केली जाते त्यामध्ये चिमुकले सुद्धा सहभागी होतात.

सय्यद हसन .सय्यद हसनैन.यांचा पहीला रोजा (उपवास) असल्याने इफ्तार पुर्वी नविन कपडे फुलांचा हार व मिठाई भरवून शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.नरसी येथील काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक हाजी हुसेनसाब यांचे पुतणे व दैनिक विष्णुपुरी एक्स्प्रेस नायगाव तालुका प्रतिनीधी सय्यद अजिम हाजी हुसेनसाब नरसीकर यांचे हे दोन सुपुत्र आहेत .यांनी आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास )धरल्याने दोन्ही भावाचा सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button