नांदेड| पोलीस धिक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष पथकाने सोनखेड ते दगडगांव रोडवर दोन अवैध रेती वाहतुक करणारे हायवा किंमती 35 लक्ष 40 हजाराचा मुददेमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैध्यरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत विशेष पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदयावर कार्यवाही करणेबावत आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे आज दिनांक 27/12/2024 रोजी पोलीस स्टेशन सानखेड हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, गंगाबेट नदिपात्रातून विनापरवाना अवैध रेतीची चोरी करुन विक्री करण्याचे उददेशाने वाहने जात आहेत.
अशा माहितीवरुन विशेष पथकाने सोनखेड ते दगडगांव रोडवर थांबुन छापा मारले असता टाटा हायवा वाहन क्रमांक MH 26 BE 2349 व MH 12 QG 1641 हे अवैर्धारत्या रेतीची वाहतूक करतांना मिळून आले. सदर दोन्ही चाहने व रेती जप्त करुन पोलीस स्टेशन सोनखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्मागरी करणा-या पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
या कार्यवाहीत सोनखेड ते दगडगांव रोडवर 17 लक्ष 20 हजाराचा एक टाटा हायवा वाहन जिचा पासिंग क्रमांक MH 26 BE 2349 चा चालक केशव बाबू केंद्रे वय 36 वर्षे रा. संगमवाडी ता. कंधार जि. नांदेड आणि हायवा मालक अविनाश कदम रा.लोहा जि. नांदेड कि. अं. 17 लक्ष रुपये ज्यामध्ये अवैद्य गौण खनिज रेती अंदाजे 04 ब्रॉस कि. अं. 20,000/- रु. आणि दुसरा हायवा क्रमांक MH 12 QG 1641 चा चालक व मालक दिपक सूर्यकांत टापरे वय 27 वर्षे रा. आनंदनगर ता.जि.नांदेड किंमत 18 लक्ष 20 हजाराचा वाहन कि. अं. 18 लक्ष रुपये ज्यामध्ये अवैद्य गौण खनिज रेती अंदाजे 04 ब्रॉस कि. अं. 20.000/- रुपये असा एकुण 35 लक्ष 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नदिड (IPS), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोवर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार, पोलीस अंमलदार विलास बोरोळे, नंदु पवार, राजेश नागलपल्ले, खलिल शेख, मारोती सोनटक्के यांनी केली आहे.