seizes two illegal sand transporters : विशेष पथकाने दोन अवैध रेती वाहतुक करणारे हायवा किंमती 35 लक्ष 40 हजाराचा मुददेमाल जप्त -NNL
नांदेड| पोलीस धिक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष पथकाने सोनखेड ते दगडगांव रोडवर दोन अवैध रेती वाहतुक करणारे हायवा किंमती 35 लक्ष 40 हजाराचा मुददेमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैध्यरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत विशेष पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदयावर कार्यवाही करणेबावत आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे आज दिनांक 27/12/2024 रोजी पोलीस स्टेशन सानखेड हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, गंगाबेट नदिपात्रातून विनापरवाना अवैध रेतीची चोरी करुन विक्री करण्याचे उददेशाने वाहने जात आहेत.
अशा माहितीवरुन विशेष पथकाने सोनखेड ते दगडगांव रोडवर थांबुन छापा मारले असता टाटा हायवा वाहन क्रमांक MH 26 BE...
