नांदेड l येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांचे निर्माणाधिन मंदिर हे सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे अशी अपेक्षा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केली.


गुरु रविदास मंदिराच्या कामठा खु. येथील जागेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, व्यंकटराव दुधंबे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप पाटील पुयड हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आपल्या भाषणात इंजि. देगलूरकर पुढे म्हणाले की, भूमिपूजन झाले की लगेच बांधकाम सुरु करुन एका वर्षात मंदिर व सभागृह उभारण्यात यावे. येणारी गुरु रविदास जयंती या सभागृहात साजरी करण्यात यावी. यासाठी सर्व समाज बांधवांना आपापल्या परिने जास्तीत जास्त त्याग करावा लागणार आहे व समाजाने संघटित राहणे हे देखिल आवश्यक आहे.

यावेळी व्यंकटराव दुधंबे यांनी भाषणबाजीपेक्षा प्रत्यक्षात कृती कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. या निर्माणाधिन मंदिराच्या कामासाठी एक लाख रुपयांचे बांधकाम साहित्य लगेच देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. गोविंद जानोळे (उपसरपंच), राजू केशवराव पुयड (उपसरपंच), पत्रकार आनंद सोनटक्के, पत्रकार गंगाधर सोनटक्के, श्रीराम गोरे, डाॅ. कैलाश भाडेकर, सतीष गोवंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सर्वश्री राहुल गोरे, प्रकाश गोरे, अशोक गोरे, राजेश गोरे, धनंजय गोरे, पवन गोरे, नागेश गोरे, सचिन गोरे, रमेश भाडेकर, सचिन भाडेकर, मारोती भाडेकर, शिवाजी भाडेकर, किशनराव गोरे, विकास गोरे आदिंनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद भाडेकर यांनी केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.