Chandraprakash Degalurkar ; कामठा येथील रविदास मंदिर सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे – चंद्रप्रकाश देगलूरकर
नांदेड l येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांचे निर्माणाधिन मंदिर हे सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे अशी अपेक्षा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केली.
गुरु रविदास मंदिराच्या कामठा खु. येथील जागेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, व्यंकटराव दुधंबे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप पाटील पुयड हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या भाषणात इंजि. देगलूरकर पुढे म्हणाले की, भूमिपूजन झाले की लगेच बांधकाम सुरु करुन एका वर्षात मंदिर व सभागृह उभारण्यात यावे. येणारी गुरु रविदास जयंती या सभागृहात साजरी करण्यात यावी. यासाठी सर्व समाज बांधवांना आपापल्या परिने जास्तीत जास्त...
