नांदेडलाइफस्टाइल

Amarbhau Rajurkar ; सिडको येथील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्थेच्या विरूगंळा केंद्रातील प्रलंबित कामे तात्काळ करा

नवीन नांदेड l सिडकोतील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरीक संस्थेचा विरंगुळा केंद्रामधील नावामनपा प्रशासनाने प्रलंबित कामे तात्काळ करण्यात यावी अशी मागणी नांदेड शहर भाजपा महानगर अध्यक्ष तथा माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सिडको परिसरातील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्था या ठिकाणी मनपा प्रशासन कडे सतत मागणी करून ही कामे प्रलंबित ठेवली आहेत, माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांनी 9 जुनं रोजी सदिच्छा भेट दिली असता शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी यांचेकडून सिडको येथील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्थेचे काम करणेसाठी दिनांक 22 जुलै 24 रोजी लेखी पत्र दिलेले आहे, परंतु अद्यापही कामे झाली नाहीत, यात बोअर पाडून,मोटार टाकून,पाईपलाईन करणे.

या केंद्रात जेष्ठ नागरिकासाठी व्यायामाचे साहित्य उदा. जिम व तसेच करम, कार्यक्रमासाठी साऊंड बॉक्स, करमणुकीसाठी टि.व्ही. संच बसवून देणे.विरंगुळा केंद्रात चारही बाजूने जेष्ठाना फिरण्यासाठी फुटपाच करुन देणे.संस्थेच्या ग्राऊंडमध्ये जेष्ठ नागरिकांना बसणेसाठी सिमेंटचे 25 बैचेस उपलब्ध करुन देणे.

संस्थेच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपन करणे व झाडे लाऊन सुशोभित करण्याची व्यवस्था करणे आदी कामांचा समावेश असुन संबंधित कामे करण्यासाठी मनपा प्रशासनाला पाठपुरावा करून द्यावा अशी मागणी प्रांत सचिव जयवंत सोमवाड, सिडको अध्यक्ष विश्वनाथ शिंदे, उपाध्यक्ष सत्यनारायण खंडोजी ऊदंडे,सचिव पंढरीनाथ मोटरगे,सहसचिव काशीनाथ गरड, कोषाध्यक्ष नरोधदीन इस्माईल साब, सदस्य भागिरथी बच्चेवार,मनोहर सोनुले, अरविंद कुलकर्णी, देविदास कदम यांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button