HomeनांदेडPota Z.P. School : पोटा जि.प. शाळेची जागा कोणाच्या नावावर..? मालकी हक्क...

Pota Z.P. School : पोटा जि.प. शाळेची जागा कोणाच्या नावावर..? मालकी हक्क सांगून कामात अडथळा

वडगांव/पोटा| जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोटा बु. शाळेची इमारत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सन १९६२ ला स्थापना झालेल्या शाळेच्या सहा खोल्या बांधकाम पूर्ण झाले असले तरी ती शाळा एक ते आठ वर्गाची आहे. आता शाळेसाठी मंजूर निधीतून होऊ लागलेल्या कामास शेजारील शेतकऱ्याने शाळेची जागा आमच्या मालकीची असल्याचे सांगत अडथळा निर्माण केल्याने नेमकी ही जागा कोणाच्या नावे आहे…? असा प्रश्न पुढे आला आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोटा बु. येथील शाळा राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शाळेत कार्यरत पदे सहा तर मान्यता पदे आठ आहेत. शाळेच्या भौगोलिक विकासासाठी गाव नमुना नंबर आठ अ. ला नोंद नसल्याची संबंधित शेतकऱ्याकडून कांगावा करून ही जागा माझ्या मालकी हक्काची असल्याचे सांगत विकास कामाला खोडा घातल्या जात आहे. नव्याने शाळेला बांधकाम करण्यासाठी शाळा खोली व किचन रूम, शौचालय मंजूर होवून बांधकामाचा भूमिपूजन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलं. मात्र या बांधकामाला शेजारील शेतकऱ्याकडून अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

IMG 20250911 WA0023 Pota Z.P. School : पोटा जि.प. शाळेची जागा कोणाच्या नावावर..? मालकी हक्क सांगून कामात अडथळा

सन २०२३ मध्ये जिल्हा परिषद शाळेच्या भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी शाळा निरीक्षण समिती अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश एक नांदेड व अतिरिक्त सत्र न्यायधीश नांदेड श. ए. बांगर यांनी सर्वे करून भौगोलिक सुविधेच्या अभावाबद्दल व गाव नमुना आठ बाबत संबंधित समितीचे सदस्य सचिव प्रशांत दिग्रसकर तथा शिक्षणाधिकारी यांच्याकडे तातडीने अहवाल देण्यात यावा अशा सूचना संबंधित शाळा व्यवस्थापन समिती ग्रामविकास अधिकारी यांना केल्या होत्या. तेव्हा शाळा कामांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही, असे लेखी पत्र लिहून दिल्याचे सांगण्यात येते आहे . त्यानंतर कसलाही अडथळा नव्हता आता मात्र पुन्हा बांधकामासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

IMG 20250911 WA0011 Pota Z.P. School : पोटा जि.प. शाळेची जागा कोणाच्या नावावर..? मालकी हक्क सांगून कामात अडथळा

शाळेसाठी शेतकऱ्यांच्या पुर्वजांनी दिली होती जागा
पूर्वी शाळेसाठी संबंधित शेतकऱ्यांच्या पुर्वजांनी ही जागा दिली होती, परंतु बदलत्या काळात आता राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शाळेची इमारत ही आमचीच असल्याचे सांगत संबंधीतांकडून हक्क गाजवीला जात आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही गाव नमुना नंबर आठला नोंद असून, नोंदीप्रमाणेच आतापर्यंत त्या ठिकाणी सहा खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. आता नव्याने मंजूर झालेल्या खुल्या किचन रूम, शौचालय बांधकामासाठी शेतकरी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments