Friday, June 26

Tag: Pota Z.P. School land in whose name..? Obstruction

Pota Z.P. School : पोटा जि.प. शाळेची जागा कोणाच्या नावावर..? मालकी हक्क सांगून कामात अडथळा

Pota Z.P. School : पोटा जि.प. शाळेची जागा कोणाच्या नावावर..? मालकी हक्क सांगून कामात अडथळा

नांदेड, करियर
वडगांव/पोटा| जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोटा बु. शाळेची इमारत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सन १९६२ ला स्थापना झालेल्या शाळेच्या सहा खोल्या बांधकाम पूर्ण झाले असले तरी ती शाळा एक ते आठ वर्गाची आहे. आता शाळेसाठी मंजूर निधीतून होऊ लागलेल्या कामास शेजारील शेतकऱ्याने शाळेची जागा आमच्या मालकीची असल्याचे सांगत अडथळा निर्माण केल्याने नेमकी ही जागा कोणाच्या नावे आहे...? असा प्रश्न पुढे आला आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोटा बु. येथील शाळा राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शाळेत कार्यरत पदे सहा तर मान्यता पदे आठ आहेत. शाळेच्या भौगोलिक विकासासाठी गाव नमुना नंबर आठ अ. ला नोंद नसल्याची संबंधित शेतकऱ्याकडून कांगावा करून ही जागा माझ्या मालकी हक्काची असल्याचे सांगत विकास कामाला खोडा घातल्या जात आहे. नव्याने शाळेला बांधकाम करण्यासाठी शाळा खोली व किचन रूम, शौचालय मंजूर होवून बांधकामा...
error: Content is protected !!