श्रीक्षेत्र माहूर l महाराष्ट्र शासनाच्या घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या आवाहनानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये तत्कालीन तहसीलदार किशोर यादव यांनी मौजे पडसा येथून जिल्ह्यातून सर्वप्रथम मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ केला होता. त्याच ठिकाणावरून माहूर शहरासह तालुक्यातील इतर 15 गावांना आज दि. 5 जून 2025 रोजी पासून वाळू वाटप कार्यक्रमाचा तहसीलदार मुंगाची काकडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार होता. त्याआधी रस्ता बनविण्यासाठी तसेच लाभार्थ्यासाठी काही रेतीसाठा नदीच्या वर आणून ठेवण्याच्या तहसीलदारांच्या तोंडी आदेशाने नदीत जात असलेले जेसीबी आणि नदित असलेले हायवा सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोंथूला यांनी अर्ध्या रात्रीपासून नदीत बसून पाळत ठेवत ही वाहने पकडून तहसील कार्यालयात जमा केल्याने शासनाच्या मोफत वाळू वाटप धोरणाला एका प्रकारे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी धक्का दिल्याची चर्चा माहूर तालुक्यात सुरू झाली असून वाळू वाटपाचे मुद्त संपायला फक्त तीनच दिवस उरल्याने शासनाच्या उद्देशास हरताळ फासली जाऊन हजारो घरकुलधारक पावसाळा उघड्यावर कसा काढतील हा विषय गंभीर स्वरूप धारण करत आहे…


महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार मोफत वाळू वाटप योजनेला मोठा गाजावाजा करून सुरुवात करण्यात आली. परंतु फक्त एकाच गावात घरकुलधारकांना काही घरकुलधारकांना वाळू देण्यात आली. त्यासाठी तहसीलदारांनी वाळू व्यवसायिकांना हाताशी धरून रस्ता बनविण्यास सांगितले होते. कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता रस्ता बनवा आणि दहा वाजता तहसीलदार येऊन मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ करतील असे दूरध्वनीवरून सांगितल्याची रेकॉर्डिंग अनेक व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल झालेली आहे.. या क्लिपमध्ये व्यवसायिकाची कुठलीच चूक नाही तरीही त्यांचे हायवा जेसीबी जप्त करण्यात आले असून सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तहसीलदार हे नियमाप्रमाणे मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ करणार असताना सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून तहसीलदारांची नाचक्की करण्याचा प्रकार घडवल्याने व्यावसायिक मात्र बरबाद झाले तर हजारो घरकुलधारकांना उघड्यावर राहण्यापेक्षा आत्महत्याच केलेली बरी अशा प्रतिक्रिया घरकुलधार गोरगरीब घरकुलधारकातून येत आहेत….

माहूर शहरातील शेकडो घरकुल आणि तालुक्यातील सात हजारावर घरकुले अर्धवट स्थितीत उभी असून एकालाही वाळू नसल्याने पंधरा हजार रुपये ब्रासची लाल वाळू पिवळी वाळू घेऊन बांधकाम करणे शक्य नाही. तर हजारो घरकुलधारकांंच्या पावसाळ्याच्या तोंडावर तोंडचे पाणी पळाले असून तहसीलदार शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी निघाले असताना सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी ही वाहने धरून अधिकाऱ्यांसह व्यवसायिकांची गोची केल्याने आता वाळू कुठून उपलब्ध करावी हा प्रश्न घरकूल लाभार्थ्यांना भेडसावत आहे…

विशेष म्हणजे तीन दिवसात आता हजारो ब्रास वाळू घरकुलधारकांना गोरगरीब घरकुलधारकांना कुठून उपलब्ध करून देणार हा प्रश्न अनुत्तरीत असला तरीही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून घरकुलधारकांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावे अशी असा अर्थ टाहो घरकुलधारकांनी फोडला आहे…..
