Kakada Aarti at Himayatnagar’s Kalinka Temple : हिमायतनगरच्या कालिंका मंदिरातील काकडा आरतीला महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| मनोकामना पूर्ण करणाऱ्या माता कालिंका मंदिरात कोजागिरी पोर्णिमेपासून सुरु करण्यात आलेल्या काकडा आरतीला पंचक्रोशीतील महिला मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पिढ्यान पिड्या चालत आलेली परंपरा जोपासत काकडा आरतीबरोबर हरिपाठ, विविध कार्यक्रम साजरे केले जात असल्यामुळे श्री कालिंका मंदिर परिसरात सकाळच्या प्रहरी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

हिंदू धर्मात देवी – देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केली जाणारी आरती म्हणजे काकडा आरती होय. महिनाभर चालणाऱ्या काकडा आरतीला परिसरातील महिला मंडळी सकाळच्या रामप्रहरी अभ्यंगस्नान करून घरासमोर सडा – सारवन, रांगोळी काढून नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरात एकत्र होतात. देवीच्या मूर्तींला काकडयाने ज्योत ओवाळत काकडा आरती केली जाते. तत्पूर्वी कालिंका मातेचा अभिषेक पूजा आणि त्यानंतर धर्मीक गीते गाऊन काकडा आरतीला सुरुवात होते.

आरतीनंतर विविध भजने, आरती व स्तोत्रे म्हटली जातात. श्री परमेश्वर मंदिरातून निघालेली काकडा दिंडीचे आगमन झाल्यानंतर शेवटची आरती होते. त्यानंतर पसायदान घेत काकडा आरतीचा समारोप केला जातो. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आलेल्या काकडा आरतीचा समारोप कार्तिक पौर्णिमेला भव्य महाप्रसादाने केला जाणार हे. काकडा आरतीनंतर महिला मंडळी शहरातील सर्व देवी देवतांच्या दर्शन करून पुण्य पदरी पाडून घेतात. काकडा आरतीच्या उपक्रमाला परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आगामी पंधरा दिवसाच्या काळात काकडा आरतील जास्तीत जास्त महिला मंडळींनी भक्ती भावाने उपस्थित होऊन लाभ घ्यावा असे आवाहन कालिंका मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button