श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील ऊसतोड कामगार सचिन शिवाजी तिडके वय ३५ वर्षे रा.भोगलवाडी ता.धारूर याचा ऊस तोडीच्या आर्थिक व्यवहारातुन शेतात नेऊन बळजबरीने दारु पाजून दगडाने तोंड ठेचुन जिवानिशी ठार मारल्याची घटना घडली होती.त्या बाबत आंबाजोगाई पोलिसांनी यातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.परंतु प्रकरणातील आरोपी हे पसार झाले असता त्याचा छडा लावत सिंदखेड पोलिसांना पकडण्यात यश आले असून,या कामगिरीने सिंदखेड पोलिसांचे वरीष्ठांने अभिनंदन केले तर नागरिकांतून कौतुक केल्या जात आहे.
सदर खुनातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता शेख, पोनि स्थागुशा बिड,पडवळ पोनि अंबाजोगाई ग्रामीण जि. बिड यांनी पोस्टे सिंदखेडचे सपोनि रमेश जाधवर यांना फोन वरुन माहीती दिली होती. त्या अनुषंगाने सिंदखेड पोलीसांनी गोपनिय माहीती काढुन प्रकरणातील हकीकत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना संपर्क साधुन सांगीतली असता पोलीस अधीक्षकांनी त्यांना पकडून ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यावरुन सपोनी जाधवर यांनी आरोपीचा शोध घेत असतांना दि.२ नोव्हे २०२४ रोजी आरोपी हे अॅटोमधुन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
लागलीच आरोपीतांना पकडण्यासाठी जाधवर यांनी आपले अधिनिस्त कर्मचारी पोउपनि मडावी,पोहेकाॅ पठाण,नापोकाॅ मडावी,नापोकाॅ हुसैन,पोकाॅ शेंडे यांना घेवून पाठलाग करीत केला.त्यात तीन्ही आरोपी हे पलाईगुडा गावात अॅटो सोडुन पळून जात होते, त्यांचा सतत ४ कि.मी पाठलाग करुन पकडुन त्यांचे नाव गाव सर्व माहीती घेवुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,पोलीस अधीक्षक बिड अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांना आरोपी पकडल्याची व ताब्यात देण्याची प्रक्रिया चालु होती.सिदंखेड पोलीसांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या खुनातील गुन्हेगाराना पकडून उत्कृष्ट कामगीरी केल्या बद्दल वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सिंदखेड पोलीसांना बाॅलीवूड चित्रपट व सिआयडी कथेचा आला अनुभव – बाॅलीवूड चित्रपटातील कथेनूसार सिंदखेड पोलीसांना चमका देत ४ तास शेतातून पळत आपला बचाव करण्यासाठी पळाललेले आरोपी यमराज धरमसिंग राठोड वय ३२ वर्ष रा. लसणवाडी ता. माहूर,शुभम चंद्रकांत पवार सिडको जिल्हा नांदेड,करण देविदास राठोड वय २२ वर्षे रा.नमस्कार चौक नांदेड या तिघांचा पाटलाग करु ताब्यात घेतले.यावेळी सिंदखेड पोलीसांना बाॅलीवूड चित्रपट व सिआयडी कथेचा अनुभव आला असल्याची माहिती पालाईगुडा येथील प्रत्यक्षदर्शी हजर असलेल्या नागरिकांनी सांगितले आहे.